सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! पगार मिळेल महिन्याला लाखाच्यावर; लगेचच करा अर्ज | National Horticulture Board Bharti 2024

0
303

मुंबई | राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 44 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यापैकी 19 रिक्त पदे उपसंचालक पदासाठी तर 25 पदे वरिष्ठ उद्यान अधिकारी पदासाठी आहेत. सदर रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख यापूर्वी 5 जानेवारी 2024 होती, ती 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. याआधी दुरुस्ती विंडो उघडण्याची अंतिम मुदत 6 जानेवारी ते 8 जानेवारी 2024 होती, पण आता दुरुस्तीसाठीची अंतिम मुदत बदलून 16 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 करण्यात आली आहे.

शुध्दीपत्रक वाचा (Click करा)

  • अर्ज शुल्क –
    • SC/ST – Rs. 500/-
    • General/ OBC/EWS – Rs. 1000/-
    • PWD – Nil

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी/फलोत्पादन/अन्न तंत्रज्ञान/काढणी-तंत्रज्ञान/ कृषी अर्थशास्त्र/ कृषी अभियांत्रिकी/ अन्न विज्ञान पदवीधर किंवा त्याच क्षेत्रात पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी / CA/ MCA / MBA / PG पदवी / एमफिल / पीएचडी.

वयोमर्यादा

  • उपसंचालक : या पदासाठी उमेदवाराचे वय 5 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 40 वर्ष या दरम्यान असावे.
  • वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी : या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 5 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

National Horticulture Board Bharti 2024

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNational Horticulture Board Online Application 2024
PDF जाहिरातNational Horticulture Board Online Application 2024
ऑनलाईन अर्ज कराhttps://nhbrec.ntaonline.in/
अधिकृत वेबसाईटhttps://nhb.gov.in/