Career

केंद्र शासनाची महिना 69 हजार पगाराची नोकरी हवीयं? मग संधी सोडू नका; तब्बल 2140 पदांसाठी भरती | Central Govt. Job 2024

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये भरती (Central Govt. Job 2024) प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल 2140 रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतून 1723 पदे पुरूषांसाठी तर 417 पदे महिलांसाठी राखीव आहेत.

इच्छुक उमेदवारांनी या भरती (BSF Recruitment 2024) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अजून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुरू झालेले नाहीय. लवकरच याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. साधारणपणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एक महिन्याचा कालावधी अर्ज भरण्यासाठी दिला जाणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती लवकरच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल. अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in या ठिकाणी ट्रेडसमन भरती 2024 ची एक अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल ती तपासणे गरजेचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना https://rectt.bsf.gov.in/ साईटवर जाईन अर्ज करावा लागणार आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच उमेदवारांच्या विविध चाचण्या देखील घेतल्या जातील. शेवटी कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखतीव्दारे निवड केली जाईल.

Back to top button