नागपूर | नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती (Nagpur Improvement Trust Bharti 2023) केली जात आहे. याठिकाणी भुमापक/ सव्र्व्हेअर/परीनिरिक्षक/ शिरस्तेदार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे. (Nagpur Improvement Trust Bharti 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्ज आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास सदर, नागपूर – 440001
शैक्षणिक पात्रता – शासनाच्या भुमी अभिलेख, नगर भूमापन कार्यालयात भुमापक तथा तालुका निरिक्षक, जमिनीचे मोजमाप/सर्व्हे करण्याचा व तत्सम पदावर काम केल्याचा पुरेसा अनुभव.
अर्जदार शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेला असावा. वयोमर्यादा 65 वर्ष. अर्जदाराविरुध्द कोणतीही विभागीय चौकशी चालू/ प्रलंबित तथा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसेच फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. कर्मचारी शासकीय / निमशासकीय सेवेमधुन सेवानिवृत्त झालेला असावा, जाहिरातीमध्ये नमुद पदाच्या कामाचा पुरेसा अनुभव असावा, तो शारीरीक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.
PDF जाहिरात – NIT Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.nitnagpur.org