Career

10वी/ITI उमेदवारांसाठी एसटी महामंडळात भरती, 192 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | MSRTC Bharti 2024

पुणे | महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुणे विभागात रिक्त जागांसाठी भरती (MSRTC Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण आणि सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

‘शिकाऊ उमेदवार’ या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याची जाहिरात www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MSRTC Bharti 2024

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज 22 जानेवारी 2024 या तारखेपर्यंक करता येणार आहेत. या शिकाऊ उमेदवार भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 300 रुपयांचा धनार्कष एसआरटीसी एसटी फंड अकाउंट पुणे या नावाने काढून तो अर्जासोबत जोडावा लागेल.

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक, एसटी विभागीय कार्यालय, शंकरशेठ रस्ता, पुणे या पत्त्यावर 16 ते 22 जानेवारी या कालावधीत समक्ष हजर राहून सकाळी 10 ते सायंकाळी 5:10 या कार्यालयीन वेळेत (शनिवार व रविवार) वगळून) सादर करावी, अशी माहिती विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी दिली आहे.

‘या’ पदांसाठी भरती (MSRTC Bharti 2024)

  • मोटार मेकॅनिक व्हेईकल – पदे 71 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील मोटार यांत्रिक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • ऑटो इलेक्ट्रिशियन – पदे 25 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – पदे 32 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील शीट मेटल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • मेकॅनिक डिझेल – पदे 26 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • वेल्डर – पदे 20 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील वेल्डर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • पेंटर – पदे 4 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील पेंटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • मेकॅनिक (एअर कंडिशन) – पदे 4 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील यांत्रिकी (रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • टर्नर – पदे 4 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील टर्नर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • बेंच फिटर/फिटर – पदे 2 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील बेंच फिटर/फिटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंट – पदे 4 – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील कॉम्प्युटर ऑपरेटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण

PDF जाहिरात MSRTC Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.msrtc.gov.in/
ऑनलाईन अर्ज – https://www.apprenticeshipindia.gov.in/

Back to top button