जलसंपदा विभाग Objection Link सूरू, Answer Key, Response Sheet त्वरित चेक करा | Jalsampada Vibhag Bharti 2024

Share Me

मुंबई | जलसंपदा विभाग भरती Objection Form Link सुरु झाली आहे. या संदर्भातील SMS उमेदवारांना प्राप्त झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण सादर करू शकता.

?जलसंपदा विभाग ऑब्जेक्शन लिंक 


जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- २०२३ राज्यातील १२६ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक २७.१२.२०२३, २९.१२.२०२३, ३१.१२.२०२३, ०१.०१.२०२४ व ०२.०१.२०२४ या तारखांना घेणेत आलेली आहे. टि.सी.एस. आय. ओ.एन. यांचेकडून दि.०५.०१.२०२४ पासून संबंधित – उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व अपेक्षित असलेली उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.०८.०१.२०२४ ते दि.१०.०१.२०२४ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकतीबाबत टि.सी.एस. चे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. टी.सी.एस कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करीता रु.१००/- प्रमाणे फी आकारण्यात येते. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येईल व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही. 

? Download Responce Sheet Link


जलसंपदा विभाग सरळसेवा भरती परिक्षेचे वेळापत्रक जाहीर.. Jalsampada Vibhag Bharti 2023

मुंबई | जलसंपदा विभागांर्तगतची भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षाबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ते खालील प्रमाणे असेल.


अर्ज करण्याची शेवटची संधी, 10 वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; 1 लाखाहून अधिक पगार | Jalsampada Vibhag Bharti 2023

मुंबई | जलसंपदा विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठ्या प्रमाणात भरती (Jalsampada Vibhag Bharti 2023) केली जाणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 4497 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

Jalsampada Vibhag Bharti 2023

प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. अर्ज सुरू होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात WRD Maharashtra Bharti 2023
सरळसेवा भरती (गट ब (अराजपत्रित) व गट क) – शुद्धीपत्रक
ऑनलाईन अर्ज कराwrd.maharashtra.gov.in


Share Me