Tuesday, September 26, 2023
HomeCareerसार्वजनिक बांधकाम विभागात 'या' रिक्त पदाची भरती, त्वरित अर्ज करा | Maharashtra...

सार्वजनिक बांधकाम विभागात ‘या’ रिक्त पदाची भरती, त्वरित अर्ज करा | Maharashtra PWD Recruitment 2023

मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले असून, इच्छूक आणि पात्र उमेदवारांना 4 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

याठिकाणी, ‘व्यवस्थापकीय संचालक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या केंद्र शासनाच्या सेवेतील किमान स्तर ( Level) – 14 वेतनश्रेणीतील किंवा राज्य अभियांत्रिकी सेवेतील किमान स्तर (Level) एस-30 वेतनश्रेणीतील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – 32

PDF जाहिरातMaharashtra PWD Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटpwd.maharashtra.gov.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular