Infosys मध्ये नोकऱ्याच नोकऱ्या, 1434 रिक्त जागांसाठी भरती; फ्रेशर्स, अनुभवी, पदवी, पदव्युत्तर पदवीधारकांना संधी | Infosys Recruitment 2023

पुणे | भारतातील प्रसिध्द टेक कंपनी Infosys मध्ये नवीन वर्षात विविध रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध आहे. यासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव गरजेचा आहे. तर काही पदांसाठी फ्रेशर्स उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. indeed या वेबसाईटने (Infosys Recruitment 2023) दिलेल्या माहितीनुसार Infosys मध्ये या वर्षात 1434 रिक्त जागांसाठी भरतीची नोटिफिकेशन प्रसिध्द करण्यात आली आहे.

इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड ही एन्‌.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात 1981 मध्ये स्थापलेली माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. 1983 साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले आहे. सध्या infosysची भारतात नऊ सॉफ्टवेअर विकासकेंद्रे असून जगभरात 30 ठिकाणी कार्यालये आहेत. कंपनीचा विस्तार दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत असून त्यामुळेच कंपनीमध्ये सातत्याने भरती केली जात असल्याचे दिसते.

Infosys मध्ये खालील पदांसाठी भरती

Technology Lead – .Net (5-8 years) – Pune
SAP PI/PO/CPI Consultant
SAP HANA Consultant
SAP MII Consultant
.Net Senior Developer
SAP CPI Mid-level Consultant
SAP SD Consultant
Technology Analyst – UI (3-5 years) – Nagpur
Computer System Validation Consulting

इन्फोसिस मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांनी वरील पोस्टच्या लिंकनुसार त्या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट तपासून अर्ज करावेत. त्याचबरोबर इतरही विविध पदांसाठी – Infosys Job किंवा Infosys Recruitment 2023 या लिंकचा वापर करावा. विशेष म्हणजे Infosys मध्ये फ्रेशर्स पदवीधरांनाही नोकरीची कायम संधी उपलब्ध असते. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी अवश्य प्रयत्न करावेत.