मुंबई | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत रिक्त पदांची भरती (Maharashtra Metro Rail Corporation Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 134 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Maharashtra Metro Rail Corporation Recruitment 2023
वरील रिक्त पदांची भरती नागपूर, पुणे आणि नवी मुंबई याठिकाणांसाठी केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
आवश्यक कागदपत्रे – एसएससी (इयत्ता 10वी) किंवा त्याच्या समकक्ष गुणपत्रिका, जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समकक्ष प्रमाणपत्र किंवा चिन्ह, जन्मतारीख दर्शविणारी पत्रक किंवा जन्मतारीख दर्शविणारी शाळा सोडल्याचा दाखला). ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी एकत्रित मार्कशीट. NCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र चिन्ह दर्शविते. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, आणि जेथे लागू असेल तेथे EWS प्रमाणपत्र. PwBD उमेदवाराच्या बाबतीत अपंगत्व प्रमाणपत्र. डिस्चार्ज सर्टिफिकेट / सर्व्हिंग सर्टिफिकेट
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज/ कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Maharashtra Metro Rail Corporation Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Maharashtra Metro Rail Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/