महाबीज मध्ये 291 पदे रिक्त, लवकरात लवकर पदभरती अपेक्षित | MahaBeej Akola Bharti 2023

Share Me

अकोला | शेतकऱ्यांची संस्था अशी ओळख असलेल्या महाबीज मध्ये 62 रिक्त पदांच्या भरतीसाठी (MahaBeej Akola Bharti 2023) मान्यता मिळाली आहे. परंतु, या पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली नाही. ही सर्व पदे एजन्सीमार्फत भरली जाणार असल्याची माहिती आहे. या प्रक्रियेला वेग कधी येणार व उर्वरित पद भरतीला कधी मान्यता मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्याच्या घडीला ‘महाबीज’चा कारभार 390 पदांवर सुरू आहे. एकूण 681 पदे मंजूर असताना 291 पदे रिक्त असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे बीजोत्पादनाच्या कामावरही परिणाम होत असून, ही पदभरतीची प्रक्रिया कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाबीज मध्ये कुशल अनुशेषामुळे प्रशासकीय यंत्रणा ढेपाळत आहे. त्यामुळे आतापर्यंत नफ्यात चालणाऱ्या या संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. गतवर्षी 269 पदे रिक्त होती. मात्र, यावर्षी ही संख्या वाढून 291 झाली आहे. विशेष म्हणजे, ब व क गटातील रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे.


Share Me