Career

गोवा समग्र शिक्षा अंतर्गत विविध पदांकरिता थेट मुलाखतीव्दारे भरती, संधी चुकवू नका | Goa RMSA Bharti 2023

पणजी | गोवा समग्र शिक्षा विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Goa RMSA Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पर्यटन आणि आदरातिथ्य, आरोग्य सेवा, बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा, बांधकाम, प्लंबिंग, सौंदर्य आणि निरोगीपणा, इलेक्ट्रॉनिक्स पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त जागांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – शिक्षण संचालनालय, पोर्वोरिम गोवा

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पर्यटन आणि आदरातिथ्यमान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा/पदवी
आरोग्य सेवाडिप्लोमा (GNM (जनरल नर्सिंग मिडवाइफरी)) एकूण 3 वर्षांचा अनुभव ज्यापैकी 2 वर्षांचा क्षेत्र विशिष्ट अनुभव किंवा 1 वर्षाचा अध्यापन अनुभव
बँकिंगमान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वाणिज्य/व्यवस्थापन/फायनान्समधील पदव्युत्तर शिक्षण, या क्षेत्रातील किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
आर्थिक सेवा आणि विमामान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.टेक, किमान 1 वर्षाच्या कामाचा/अध्यापनाचा अनुभव
बांधकाममान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.टेक, किमान 1 वर्षाच्या कामाचा/अध्यापनाचा अनुभव किंवा 2 वर्षाच्या कामाचा/शिक्षणाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा
सौंदर्य आणि निरोगीपणाएखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून कॉस्मेटोलॉजी/ब्युटी थेरपी/सौंदर्य संस्कृतीमध्ये डिप्लोमा किमान 1 वर्ष संबंधित क्षेत्र/व्यवसायात काम/शिक्षणाचा अनुभव.
इलेक्ट्रॉनिक्सबी.ई. / B. टेक. संबंधित क्षेत्रातील एक वर्षाच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशनमध्ये

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातGoa RMSA Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://gssa.goa.gov.in

Back to top button