2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

अर्ज करण्याची शेवटची संधी : 345 रिक्त जागांसाठी भरती, या सरकारी नोकरीत मिळेल महिना 92 हजारपर्यंत पगार | Maha Food Bharti 2023

मुंबई | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग,अंतर्गत पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यात (Maha Food Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 13 डिसेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर  2023 आहे. यासाठीची परिक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे.

Maha Food Bharti 2023

पात्र उमेदवारांनी या कालावधीत https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ (लिंक उद्या पासून सुरु होईल) या लिंकद्वारे (Web- based) ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक 13 डिसेंबर, 2023 रोजी 00.01 पासून ते दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी 23.59 पर्यंतच्या कालावधीत करता येईल.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. तर परीक्षेचा दिनांक विभागाच्या संकेतस्थळाद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी विभागाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणे गरजेचे आहे. ही जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.

PDF जाहिरात Maha Food Mumbai Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराhttps://ibpsonline.ibps.in
अधिकृत वेबसाईटwww.maharashtra.gov.in

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles