मुंबई | लोकशाही मराठी (Lokshahi Marathi News) या खाजगी वृत्तवाहिनीचे प्रसारण बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. संध्याकाळी सहा वाजलेपासून चॅनेल बंद करण्यात यावे असे आदेशात म्हणटले आहे. याबरोबरच मंत्रालयाकडून चॅनेलचे लायन्सस देखील 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
येत्या 26 जानेवारी रोजी लोकशाही मराठी चौथा वर्धापन दिन साजरा करणार होती. पण, गेले काही दिवस वारंवार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याकडून या वृत्तवाहिनीस नोटीस देण्यात येत होत्या. 14 जुलै 2023 रोजी दाखवण्यात आलेल्या एका बातमीमुळे 72 तास हे चॅनेल बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्यावतीने अपील करण्यात आले होते. त्यानंतर बंदी आदेश रद्द करण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा लोकशाही मराठी चॅनेलचे लायन्सस रद्द करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.
चार महिन्यांपूर्वी प्रसारण खात्याने लोकशाही मराठी वृत्तवाहिनीकडून काही माहिती मागवली नव्हती. परंतु ती अचानकपणे वेगवेगळी कारणे देत माहिती मागविण्यात आली. यामध्ये लायन्ससबाबत प्रश्न उपस्थित करत लोकशाही मराठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.