मुंबई | LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी मेगाभरती (LIC HFL Bharti 2024) केली जाणार आहे. एकूण 250 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात असून 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स कडून केल्या जाणाऱ्या या भरती (LIC HFL Bharti 2024) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
LIC HFL Bharti 2024
- वयोमर्यादा –
- किमान वयोमर्यादा: 20 वर्षे
कमाल वयोमर्यादा: 25 वर्षे
- किमान वयोमर्यादा: 20 वर्षे
शैक्षणिक पात्रता: 01 डिसेंबर-2023 रोजी कोणत्याही विषयातील पदवी पूर्ण केलेली असावी, परंतु ही पदवी 1 एप्रिल 2020 पूर्वी घेतलेली नसावी.
कामाचा अनुभव: उमेदवाराचा इतर कोणत्याही संस्थेसोबत चालू/समाप्त/पूर्ण प्रशिक्षणार्थी करार नसावा.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी www.lichousing.com या वेबसाइटवर (करिअर: रेझ्युमे सबमिट करा) रीतसर भरलेल्या अर्जासोबत बायोडाटा सबमिट करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.lichousing.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – LIC Housing Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For LIC HFL Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.lichousing.com
प्रवेश परीक्षा तपशील – BFSI Sector Skill Council of India द्वारे प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
क्र. क्र | विशेष | तपशील |
१ | प्रवेश परीक्षा विषय | मुलभूत बँकिंग, गुंतवणूक आणि विमा यावर 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील सोबत परिमाणात्मक/तर्क/डिजिटल/संगणक साक्षरता/इंग्रजी |
2 | प्रवेश परीक्षेचा कालावधी | 60 मिनिटे |
3 | प्रवेश परीक्षा नमुना | ऑनलाइन रिमोट प्रोक्टोर उमेदवारांनी त्यांच्या घरून दिलेला आहे परंतु पूर्ण गोपनीयतेमध्ये त्यांचा स्मार्ट मोबाईल फोन फ्रंट कॅमेरासह वापरून (त्यामुळे चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असेल) |
4 | BFSI Sector Skill Council of India ला प्रवेश परीक्षा शुल्क देय | (1) सामान्य श्रेणी आणि OBC साठी रु.944 (2) अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांसाठी रु.708 (3) PWBD उमेदवारांसाठी रु.472 |