IndiGo विमानसेवा कंपनीत Any Graduate उमेदवारांना नोकरीची संधी, 3 लाखाहून अधिक पगार | IndiGo Recruitment 2023

0
659

मुंबई | राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्वरूपाची विमान सेवा पुरवणार्‍या इंडिगोने एक्झिक्युटिव्ह – कस्टमर एक्स्पिरियन्स (Executive – Customer Experience) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. सदर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एक्झिक्युटिव्ह – कस्टमर एक्स्पिरियन्स पोस्टसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी रोटेशनल शिफ्ट आणि रोटेशनल वीकऑफ मध्ये काम करण्यास तयार असावे असे कंपनीचे म्हणणे आहे. या पदाचे नोकरीचे ठिकाण गुरुग्राम आहे.

भूमिका & जबाबदाऱ्या
1. ई-मेलद्वारे ग्राहकांच्या तक्रारी आणि प्रश्नांना प्रतिसाद देणे.
2. ग्राहकांना येणार्‍या अडचणींसंदर्भात ग्राहकांना कॉल करून, ग्राहकांना समस्या सोडवण्यात मदत करणे.
3. अडचणी सोडवण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधून ग्राहक समस्या लवकरात-लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणे.
4. विशेषतः एअरपोर्ट कॉल सेंटर, फायनान्स या विभागांसोबत आणि वित्त यांच्याशी समन्वय साधणे.
5. मोठ्या संख्येने ग्राहकांच्या प्रश्नांना आणि तक्रारींना प्रतिसाद देणे.

अर्ज करणार्‍या उमेदवारामध्ये खालील गुण असणे आवश्यक :
– शिकण्याची आवड
– वेळेचे व्यवस्थापन
– संघात काम करण्याची क्षमता
– ग्राहक केंद्रित दृष्टीकोन

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये:
1. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
2. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उत्कृष्ट संभाषण (मौखिक आणि लेखी दोन्ही) कौशल्ये असणे आवश्यक आहे.
3. चांगले टायपिंग कौशल्य असणे आवश्यक आहे.

कामाचा अनुभव:
– ईमेल प्रोसेसिंगमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
– ग्राहक तक्रार हाताळताना कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पगार:
इंडिगोमधील ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्हचा वार्षिक सरासरी पगार 3 लाख किंवा त्याहून अधिक असू शकतो.

भरतीची जाहिरातIndigo Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For IndiGo Job 2023