पदवी किंवा पदवीला बसलेल्यांसाठी आर्मी NCC भरती; 2.50 लाखापर्यंत पगार.. ऑनलाईन अर्ज करा | Indian Army NCC Recruitment 2024

0
258

मुंबई | भारतीय सैन्य अंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी (Indian Army NCC Recruitment 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा सर्व वर्षांचे गुण विचारात घेऊन किमान ५०% गुणांसह समतुल्य. अंतिम वर्षात शिकत असलेल्यांना देखील अर्ज करण्याची परवानगी आहे जर त्यांनी अनुक्रमे तीन/चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन/तीन वर्षांमध्ये किमान 50% एकूण गुण प्राप्त केले असतील.

या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज 08 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातIndian Army NCC Special Entry Notification 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 08 जानेवारी 2024 पासून)https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx