मुंबई | राज्याच्या सहकार आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय सहकार, लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.) या दोन्ही परीक्षेचा निकाल (GDC & A Result) सोमवारी (ता.८) जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल सहकार विभागाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
गुणांची फेरमोजणी करू इच्छिणाऱ्यांना उमेदवारांना यासाठी येत्या २३ जानेवारीपर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. यासाठी प्रती विषय ७५ रुपयांप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.
बँकेचे चलन ऑनलाइन प्राप्त करून घेण्याची अंतिम मुदत ही २३ जानेवारी तर, हे चलन बँकेत कार्यालयीन वेळेत भरण्याची मुदत २५ जानेवारी २०२३ अशी ठेवण्यात आल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.