8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? How to view land Map online

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे जमिनीचा नकाशा असणे फार आवश्यक असते. आता सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो कसा वाचायचा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती घेऊया..

जमिनीचा नकाशा कुठे आणि कसा पाहायचा? How to view land Map online

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

आता गावचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया.

वर सांगितलेल्या वेबसाईटवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचे राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन यापैकी तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे आणि सगळ्यात शेवटी Village map वर क्लिक करायचे आहे.

Village Map वर क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात आहे, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता. त्यानंतर डावीकडील (+) किंवा (-) या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसतात, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर परत जाता येते.

आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया..

वर दिलेल्या साईटच्या पेजवर Search by Plot Number या नावाने एक रकाना दिलेला आहे. इथे तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होईल. नकाशा ओपन झाल्यानंतर डावीकडे Plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती उपलब्ध होईल.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

नकाशा

ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो. यावर क्लिक केले की, तुमच्या जमिनीचा Plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावर उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केल्यास हा नकाशा तुम्ही डाऊनलोडही करू शकता.

तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक त्याखालीच दिसतात. जसे की 322 या गटाशेजारी 323, 324, 326,327,328,329 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात. तसेच खालच्या भागात या गट नकाशात कोण-कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याचीही सविस्तर माहिती दिलेली दिसते.

ई-नकाशा प्रकल्प काय?

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हद्दी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात. पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत असतात. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे.

ई-नकाशा प्रकल्पांतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचे डिजिटायजेशन करण्यात येत आहे. त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. महत्वाचं म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसून घरबसल्या मोबाईलवर तुम्ही हे काम करू शकता.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles