7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

गुगलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळेल 60 लाखाहून अधिक पगार.. जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती | Google Jobs 2023

मुंबई | आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे गुगलमध्ये नोकरी (Google Jobs 2023) मिळवण्याचे स्वप्न असते. कारण गुगल कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देते, तसेच वेतनाच्या बाबतीतही ही कंपनी सर्वोत्तम आहे. त्यामुळे अनेकजण गुगल मधील नोकऱ्यांच्या शोधात असतात.

Google Jobs 2023

गुगल मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुगल सोशल मीडिया, तसेच आपल्या जॉब प्लॅटफॉर्मवर नोकऱ्या आणि भरतीशी संबंधित पोस्ट्स शेअर करते. नुकतीच गुगलने बेंगळुरूमध्ये असलेल्या आपल्या ऑफिसकरिता प्रॉडक्ट मॅनेजर पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी आवश्यक पात्रता, स्किल्स आणि जॉब डिस्क्रिप्शन या संदर्भातील सर्व माहितीही शेअर केली आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 60 लाख रुपयांहून अधिक वेतन दिले जाणार आहे.

गुगल कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेले तरुण google.com/careers या वेबसाइटवर किंवा लिंक्डइनवर याबाबतच्या व्हेकन्सी चेक करू शकतात.

गुगल मॅप्समध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी

गुगल मॅप हे गुगल कंपनीचे सर्वात प्रसिध्द असेलेले प्रोडक्ट आहे. याच्या माध्यमातून अनेक जण रस्ता किंवा विशिष्ट ठिकाणाचा शोध घेतात. त्यावरच्या रिव्ह्यूच्या माध्यमातूनही उपयुक्त माहिती मिळते. गुगलला त्यांच्या याच प्रोडक्टसाठी प्रॉडक्ट मॅनेजर पदे भरायची आहेत. त्याकरिता अर्ज मागवण्यात आले आहेत.

गुगल मॅप्समध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून निवड झालेल्या व्यक्तीला करावी लागतील ही कामे

  1. कंटेंट मॉडरेशन टीमसोबत (रिव्ह्यू, मीडिया) कारण करणं. तसंच, गुगल मॅप्ससाठी अशी नवी मॉडरेशन सिस्टीम सादर करणं, जिच्यामुळे युझर एक्स्पीरिअन्स आणि मॅप्स डेटा क्वालिटी अधिक उत्तम बनू शकेल.
  2. क्रॉस गुगल मॉडेलिंग टीमसह पार्टनरशिप करून युझरची माहिती मिळवणं आणि मशीन लर्निंग सिस्टीमवर काम करणे.
  3. डेटा लेबलिंग टीमसह काम करून डेटा क्वालिटी सुधारणे.

गुगलमधील या नोकरीसाठी आवश्यक पात्रता
1. कम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर्स डिग्री किंवा संबंधित टेक्निकल फिल्डमध्ये डिग्री किंवा या डिग्रीच्या योग्यतेचा प्रॅक्टिकल अनुभव.
2. प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये 10 वर्षांचा अनुभव.
3. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये अनुभव.

गुगलमधल्या या नोकरीसाठी आवश्यक स्किल्स
1. डेटा अ‍ॅनालिसिस स्किल्सवर प्रभुत्व
2. उत्तम लेखी आणि मौखिक संवाद कौशल्य.
3. गुगल मॅप्सवर योगदानामध्ये आवड (रिव्ह्यू, फोटो, एडिटिंग).

गुगलमधल्या या नोकरीसाठी वेतन
भारतात गुगल प्रॉडक्ट मॅनेजरला 62 लाख रुपयांपेक्षा अधिक वेतन आहे. वर माहिती दिलेले पात्रतेचे निकष तुम्ही पूर्ण करत असलात, तर उशीर न करता नोकरीसाठी अर्ज करावा. लिंक्डइनवर दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टसाठी आतापर्यंत 200 हून अधिक व्यक्तींनी अर्ज केलेला आहे.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles