7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

मुंबई मध्ये डिप्लोमा/पदवीधरांना महिना 30,000 पगाराची सरकारी नोकरी, संधी चुकवू नका | Weavers Service Centre Bharti 2023

मुंबई | विणकर सेवा केंद्र, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Weavers Service Centre Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत टेक्सटाईल डिझायनर, क्लस्टर डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह (CDE) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी (Government Job) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, विणकर सेवा केंद्र, 15-ए मामा परमानंद मार्ग, ऑपेरा घर, मुंबई -400 004
ई-मेल पत्ता – dirwzwscmum@yahoo.in

शैक्षणिक पात्रता
टेक्सटाईल डिझायनर – अर्जदार NIFT/NID मधून किंवा कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेतून उत्तीर्ण झालेला असावा, तसेच टेक्सटाईल डिझायनर म्हणून काम करण्याचा किमान 02 वर्षांचा अनुभव.

क्लस्टर डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह (CDE) – अर्जदार हा हँडलूम टेक्नॉलॉजी (DHT) किंवा टेक्सटाईल टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा/पदवीधर असावा, तसेच शक्यतो 2 वर्षांच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वरील पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांना महिना 30,000 रूपये वेतन दिले जाईल. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातWeavers Service Centre Mumbai Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरातWeavers Service Centre Mumbai Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttp://www.handlooms.nic.in/
अधिक माहितीसाठी आमच्या https://lokshahi.news या संकेतस्थळाला भेट देत रहा.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles