Career

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय कागदपत्र पडताळणीचा निकाल जाहीर, आपला निकाल बघा | DVET Bharti Result 2023

मुंबई | राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत दिनांक १६/०२/२०२३ रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT) रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी घेण्यात आली होती.

Group-B व Group-C मध्ये समाविष्ट पदांच्या सामायिक परीक्षेत (CBT) किमान ४५% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) अधिन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) दिनांक ०१/०८/२०२३ रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची (Provisional Selection List) /सुधारीत तात्पुरत्या निवड सूची (Revised Provisional Selection List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक ३०/११/२०२३ ते ०१/१२/२०२३ व ०१/०१/२०२४ या कालावधीत झालेल्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीचा निकाल (Document Verification Result) या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Download DVET Document Verification Result PDF


DVET Craft Inspector Provisional Selection List 2023 – dvet.gov.in

Back to top button