MCGM Result 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती निकाल : स्टाफ नर्स गुणवत्ता यादी जाहीर, डाउनलोड करा | MCGM Result 2024

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत रा.ए. स्मा. रुग्णालय, बा.य.ल. नायर रुग्णालय, लो. टि. म.स. रुग्णालय ही प्रमुख रुग्णालये, नायर दंत रुग्णालय, सर्व विशेष रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसुतिगृहे व उपनगरीय रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील एम-21 (रु.35400-112400 + अनुज्ञेय भत्ते) या वेतनश्रेणीतील गट-क मधील परिचारीका (Staff Nurse) या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणाऱ्या व अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दि.08/03/2023 ते दि.21/03/2023 या कालावधीत जाहीरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.

त्याअनुषंगाने, या विभागास प्राप्त झालेल्या अर्जाच्या प्राथमिक छाननीमधील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता दि. 12.07.2023 व दि. 18.07.2023 रोजी MCGM Portal वर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसारीत करण्यात आली होती. सदर यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी कस्तुरबा रुग्णालय येथे दि. 24.07.2023 ते दि.08.08.2023 पर्यंत करण्यात आली होती. उमेदवारांच्या मूळ कागदपत्रे पडताळणीनंतर परिचारीका (Staff Nurse) पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवडयादी खालीलप्रमाणे प्रसारीत करण्यात येत आहे.

Download BMC Staff Nurse Selection List

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना-
वरीलप्रमाणे, अंतिम निवडयादी MCGM PORTAL वर प्रसिध्द करण्यात आलेल्या दिनांकापासून पुढील दहा दिवसात (Actual Working 10 days) निवड झालेल्या उमेदवारांची आस्थापनानिहाय यादी व नियुक्ती संबंधित पुढील कार्यवाहीबाबतच्या सर्व सुचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. यास्तव उमेदवारांनी संकेतस्थळ वेळोवेळी पाहणे आवश्यक आहे. याबाबत लेखी स्वरुपात कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदरबाबत कोणत्याही प्रकारे या कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारी/निवेदने याची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 17 जागा भरण्यात (BMC Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार रिक्त जागांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

या भरती अंतर्गत अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक  पदांच्या  रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अति दक्षता बालरोग तज्ञएमडी/ डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर
मानद बाल हृदयरोग तज्ञडीएम / डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी/डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी
मानद बालरोग शल्यक्रियाM.CH/DNB इन पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
मानद भुल तज्ञएमडी/डीएनबी (एनेस्थिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
मानद एनडोक्रोनोलॉजिस्टएमडी/ डीएनबी (एनडोक्रोनोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी/ डीएनबी पेडियाट्रीक विथ फेलोशीप इन पेडियाट्रीक एनडोक्रोनोलॉजी
मानद बीएमटी फिजिशीयनडीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा
एमडी/ डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी आणि फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट व ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षांचा अनुभव
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ)मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लैंग्वेज पॅथॉलॉजी)
सहाय्यक वैद्यकीय अधिकारीउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेला असावा.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)उमेदवाराचे एस.एस.सी समकक्ष परिक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य किंवा कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग मधील पदविका संपादीत केलेली असावी
समुपदशकएमए इन सायकोलॉजी/कोन्सेलिंग किंवा पीजी डिग्री डिप्लोमा इन कोन्सेलिंग
माहिती तंत्रज्ञबीएससी परीक्षेत माहिती तंत्रज्ञ विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक किंवा माहिती तंत्रज्ञामध्ये डिप्लोमा आणि या क्षेत्रातील हॉस्पीटल मधील 1 वर्ष काम केलेल्याचा अनुभव. तसेच सीसीएनए आणि एमसीएसइ प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल
कनिष्ठ लेखा परिक्षकउमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वित्तीय/प्रगत लेखांकन आणि लेखा परिक्षण या विषयासह वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा
कार्यकारी सहाय्यकउमेदवार मान्याप्राप्त मंडळाची नाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
पदाचे नाववेतनश्रेणी
अति दक्षता बालरोग तज्ञ1,50,000
मानद बाल हृदयरोग तज्ञ22,000/-
मानद बालरोग शल्यक्रिया22,000/-
मानद भुल तज्ञ22,000/-
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट22,000/-
मानद बीएमटी फिजिशीयन22,000/-
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ)22,000/-
सहाय्यक वैद्यकीय अधिकारीएम.बी.बी.एस. 90,000/1,00,000
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)49,500/-
समुपदशक35,000/-
माहिती तंत्रज्ञ33,000/-
कनिष्ठ लेखा परिक्षक27,500/-
कार्यकारी सहाय्यक22,000/-

PDF जाहिरातBMC Bharti 2023
शुध्दीपत्रक  BMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत संचालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉम्प्रिहेन्सीव थैलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पू), मुंबई – 400066

शैक्षणिक पात्रता – MD/MS/DNB or equivalent degree as per NMC (MCI) with atleast 20 years experience in Pediatric/ Adult Hematology/Oncology/
वेतनश्रेणी – 2,64,000/-

PDF जाहिरातBMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता सफाई कामगार पदांच्या रिक्त जागांची भरती (BMC Bharti 2023) केली जाणार आहे.

वरील रिक्त पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

BMC Bharti 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ‘ए’ विभाग, 134 ई, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई 400001.

वरील रिक्त पदांसाठी 4 थी पास उमेदवार पात्र असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिदिन 03 तासांकरिता मासिक ठोक वेतन रुपये 5000/- दिले जातील.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत B. Y. L. नायर CH. हॉस्पिटल अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. 

या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून, सहाय्यक प्राध्यापक नेत्रविज्ञान, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, बालरोग सल्लागार (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी, पूर्ण वेळ ग्रेड I ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स, विशेष शिक्षक ग्रेड I, विशेष शिक्षक ग्रेड II, ऑर्थोपेडिक्स सल्लागार (अंशवेळ), दंत तंत्रज्ञ, भूलतज्ज्ञ (अंशवेळ), व्यावसायिक समुपदेशक (अंशवेळ), पूर्णवेळ ग्रेड II ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, जी-बिल्डिंग, टी. एन. मेडिकलचा तळमजला कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीची (BMC Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, कम्युनिकेशन विशेषज्ञ पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञमेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) द्वारे MD (PSM/Community Medicine)/MD (CHA)/MD (Tropical Medicine) द्वारे MCI किंवा DNB (सामाजिक आणि प्रतिबंधात्मक औषध/सामुदायिक औषध) द्वारे मान्यताप्राप्त एमबीबीएस; EIS सह MCI द्वारे मान्यताप्राप्त एमबीबीएस प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र.
कीटकशास्त्रज्ञ1) M.Sc. कीटकशास्त्र/प्राणीशास्त्रात शक्यतो डॉक्टरेट (पीएचडी) वैद्यकीय कीटकशास्त्रात.
पशुवैद्यकीय अधिकारीपशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य किंवा पशुवैद्यकीय महामारीविज्ञान किंवा पशुवैद्यकीय औषध किंवा पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र किंवा पशुवैद्यकीय प्रतिबंधात्मक औषध किंवा पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पशुवैद्यकीय पदवी
अन्न सुरक्षा तज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातील विषयांपैकी पोषण/मायक्रोबायोलॉजीसह बॅचलरची विज्ञान पदवी अप्लाइड न्यूट्रिशन किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये मास्टर्स.
प्रशासन अधिकारीबिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) मध्ये मास्टर्स किंवा हॉस्पिटल/हेल्थ मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह प्राधान्य. बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) किंवा हॉस्पिटल किंवा हेल्थ मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह समतुल्य पदवी.
तांत्रिक अधिकारी (वित्त)MBA (फायनान्स)/ICWA/C.A/M.Com
संशोधन सहाय्यकपब्लिक हेल्थ (एमपीएच) किंवा लाइफ सायन्स किंवा एपिडेमियोलॉजी किंवा कोणत्याही आरोग्य शाखेत एमबीए सह पदव्युत्तर पदवी
तांत्रिक सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठातून MLT मध्ये B. Sc
प्रशिक्षण व्यवस्थापकMBA सह पदवीधर, शक्यतो HR व्यवस्थापन अनुभव आवश्यक
डेटा विश्लेषकComputer application पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
कम्युनिकेशन विशेषज्ञमास कम्युनिकेशन/डिजिटल मीडिया/पीआर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन/डिजिटल मीडिया/पीआर अनुभव आवश्यक

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBMC Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – BMC Recruitment Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत राजावाडी रुग्णालयाच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिक्षक, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुबई – 400007

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञबी.एस.सी (मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी MSBTE)डी.एम.एल.टी /पी.जी.डी.एम.एल.टी
औषधनिर्माताराज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदवीका D. Pharmacy किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी पदवी (B. Pharmacy)
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा.

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु.१८,०००/-
औषधनिर्मातारु.१८,०००/-

PDF जाहिरात 1 – BMC Bharti 2023
PDF जाहिरात 2 – BMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रुग्णालय विक्रोळी येथे हृदय स्पंदन आलेख तंत्रज्ञ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा कारडीओ टेक्नोलॉजी (Cardio Technology) विषयातील बी.पी.एम.टी. (Bachelor in paramedical technology in Cardio – Technology) 3, 1/2 वर्षाचा पुर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.

निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमाह 20000/- रूपये मानधन देण्यात येईल.

PDF जाहिरातBMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


Scroll to Top