Career

पुणे येथे Joyalukkas Jewellery कंपनीत पदवीधर महिला उमेदवारांना नोकरीची संधी, 200 रिक्त जागांसाठी भरती | Joyalukkas India Private Limited Bharti 2024

पुणॆ | Joyalukkas India Private Limited कंपनीच्या वतीने मोठी भरती केली जाणार आहे. तब्बल 200 रिक्त जागांसाठी कंपनीच्या वतीने भरती (Joyalukkas India Private Limited Bharti 2024) प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी पदवीधर महिला उमेदवार पात्र असून इच्छूक आणि पात्र महिला उमेदवारांनी ही संधी सोडू नये.

Joyalukkas India Private Limited ही कंपनी दागिन्यांची निर्मिती, वितरण आणि विक्री करते. यामध्ये सोने, चांदी, हिरे, घड्याळे आणि इतर मौल्यवान खडे यांची निर्मीती आणि विक्री केली जाते. Joyalukkas India आपली सेवा जगभरातील ग्राहकांना देत असल्याने याठिकाणी काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

या भरती अंतर्गत सेल्स ट्रेनी, सेल्स एक्जिक्युटिव्ह, रिसेप्शनिस्ट पदांसाठी भरती केली जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर महिला उमेदवार यासाठी पात्र असून पुणे येथील भारती विद्यापीठ, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, धनकवडी, पुणे 411043 येथे यासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2024 इच्छूक आणि पात्र महिला उमेदवारांनी सदर भरतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

नोकरीस इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जाहिरात – Joyalukkas India Private Limited Bharti 2024
नोंदणी – Joyalukkas India Private Limited Bharti Registraion

Back to top button