मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागात रिक्त पदांची भरती (DTP Maharashtra Bharti 2023) केली जाणार आहे.
याठिकामी ‘शिपाई’ (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 20 सप्टेंबर 2023 पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

वरील रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे व 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल राहील.
PDF जाहिरात – DTP Maharashtra Vacancy
ऑनलाईन अर्ज करा (20 सप्टेंबर पासून) – Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra