10 वी ते पदवीधरांना दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात नोकरी; 863 रिक्त जागा, अर्ज करण्याची शेवटची संधी | DSSSB Bharti 2023

Share Me

दिल्ली | दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती (DSSSB Bharti 2023) जाहीर करण्यात आली आहे. एकूण 863 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

DSSSB Bharti 2023

या पदभरती अंतर्गत ‘फार्मासिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ, सब स्टेशन अटेंडंट, सहाय्यक. इलेक्ट्रिक फिल्टर, कनिष्ठ जिल्हा राज्य अधिकारी, ड्राफ्ट्समन, वायरलेस/रेडिओ ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, परिरक्षण पर्यवेक्षक, सहाय्यक मायक्रोफोटोग्राफ, झेरॉक्स ऑपरेटर, कनिष्ठ ग्रंथपाल, पुस्तक बाइंडर, ग्रंथालय परिचर, परिचारिका श्रेणी – अ, विशेष शिक्षण शिक्षक, आर्किटेक्चरल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, रेडिओग्राफर, कॉम्प्युटर लॅब/आयटी असिस्टंट, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, पशुवैद्यकीय हॉस्पिटलसाठी ओटी असिस्टंट, प्लास्टर असिस्टंट, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, फोरमन (वर्क्स), प्रयोगशाळा परिचर, क्लोरीनेटर ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक माहिती अधिकारी, व्यवस्थापक, कार्य सहाय्यक (उद्यान),  ड्राफ्ट्समन Gr.III, लिब्रानन, सहाय्यक अधीक्षक, मॅट्रॉन, वार्डर, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अन्य कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातDSSSB Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For DSSSB Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://dsssb.delhi.gov.in/


Share Me