Career

खरेदी आणि भांडार विभाग (DPS) अंतर्गत 62 रिक्त जागांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | DPS Mumbai Bharti 2023

मुंबई | खरेदी आणि भांडार विभाग (DPS), अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर पदांच्या रिक्त जागा भरण्यात (खरेदी आणि भांडार विभाग (DPS) अंतर्गत 62 रिक्त जागांकरिता भरती; त्वरित अर्ज करा) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 रूपये वेतने दिले जाईल.

वरील रिक्त पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह विज्ञान पदवीधर, किंवा 60% गुणांसह वाणिज्य पदवीधर, किंवा शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थांमधून 60% गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान डिप्लोमा.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्जाची पद्धत स्वीकारली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातDPS DAE Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराDPS Mumbai Online Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.dps.gov.in/

Back to top button