8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

मुदतवाढ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात ‘शिक्षक’ होण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात; ‘या’ लिंकवरून करता येणार अर्ज | CTET Exam 2024

मुंबई | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईमार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) 2024 साठी शुक्रवारपासून (दि. 3) पासून नोंदणी (CTET Exam 2024) सुरू करण्यात आली आहे. ctet.nic.in या संकेतस्थळावरून पात्र उमेदवारांना येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

CTET Exam 2024 Date:

सीबीएसईतर्फे येत्या 21 जानेवारीला सीटीईटी आयोजित केली जाणार आहे. देशभरातील 135 शहरांमध्ये जानेवारी सत्रासाठी वीस भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. या सीटीईटीमध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 आणि 2 सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये घेण्यात येतात. पेपर 1 हा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.

पेपर 2 हा इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. सीबीएसई सीटेट ही परीक्षा एमसीक्यू पध्दतीने अर्थात बहुप्रश्न पध्दतीने घेतली जाते. या परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. सीबीईएसई- सीटेटच्या एका पेपरसाठी ओपन / ओबीसी / ईडब्ल्यूएस संवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये परीक्षा शुल्क असून एससी / एसटी उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क आहे. प्राथमिक / कनिष्ठ दोन्ही पेपरसाठी ओपन / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांना बाराशे रुपये शुल्क असून, एससी / एसटी उमेदवारांना 600 रुपये शुल्क असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

CBSE CTET 2024: या स्टेप्स करा फॉलो
स्टेप 1 – सीटीईटी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा.
स्टेप 2 – होमपेजवर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 – लिंकवर क्लिक केल्यानंतर, विचारलेल्या तपशीलांच्या मदतीने नोंदणी करा.

CTET जानेवारी 2024 पात्रता निकष
CTET जानेवारी 2024 पात्रता निकष पेपर 1 आणि पेपर 2 साठी भिन्न आहेत.

CTET जानेवारी 2024 पेपर 1 साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे
शैक्षणिक पात्रता – वरिष्ठ माध्यमिक परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% गुणांसह उत्तीर्ण. प्राथमिक शिक्षणातील 2 वर्षाचा डिप्लोमा (D.El.Ed.) किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण.
वय श्रेणी – CTET पेपर 1 मध्ये बसण्यासाठी कमाल वयोमर्यादा नाही.

CTET जानेवारी 2024 पेपर 2 साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे
शैक्षणिक पात्रता – एकूण किमान 50% गुणांसह बॅचलर पदवी. बॅचलर इन एज्युकेशन (B.Ed) च्या अंतिम वर्षात उत्तीर्ण किंवा उपस्थित असलेला किंवा त्याच्या समतुल्य एकूण किमान 50% गुणांसह.
वय श्रेणी – CTET पेपर 2 मध्ये बसण्यासाठी कमाल वयोमर्यादा नाही.
वर नमूद केलेल्या सामान्य पात्रता निकषांव्यतिरिक्त, उमेदवारांच्या काही श्रेणींसाठी काही विशिष्ट पात्रता निकष देखील आहेत, जसे की
अपंग उमेदवारांसाठी – CTET मध्ये बसण्यास पात्र असलेल्या अपंग उमेदवारांना नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिरिक्त वेळ आणि इतर सुविधा दिल्या जातील.
माजी सैनिकांसाठी सरकारी नियमांनुसार वयात सवलत आणि इतर लाभ दिले जातील.
परदेशी नागरिकांसाठी – परदेशी नागरिक देखील CTET मध्ये उपस्थित राहण्यास पात्र आहेत, जर त्यांनी सामान्य आणि विशिष्ट पात्रता निकष पूर्ण केले असतील.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles