8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

पाकिस्तानला हरवल्यानंतर आफ्रिका पॉईंट टेबलमध्ये अव्वल, टीम इंडियाचे स्थान घसरले, जाणून घ्या इतर संघांची स्थिती | Cricket World Cup 2023

Cricket World Cup 2023 – वनडे वर्ल्डकप मध्ये दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल केला आणि अव्वल स्थान गाठलं. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयानंतर टीम इंडिया मात्र दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. तर सलग चौथा सामना गमावणाऱ्या पाकिस्तानचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

Cricket World Cup 2023

दक्षिण आफ्रिकेनं स्पर्धेतील पाचवा सामना जिंकून 10 गुण मिळवत भारतीय क्रिकेट संघाकडून नंबर वनचं स्थान हिसकावून घेतलं आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांचे 10 गुण असले तरी नेट रनरेटमुळे दक्षिण आफ्रिका पहिल्या आणि टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागलेला पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला आहे.

वर्ल्डकप 2023 मधील टॉप 4 मध्ये मोठे बदल

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेनं टॉप-4 मध्ये बदल करत अव्वल स्थान गाठलं. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर घसरली. तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर कायम आहे. टीम इंडियानं पुढचा इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यास पुन्हा एकदा अव्वल स्थानावर येऊ शकते. आतापर्यंत, टीम इंडिया हा एकमेव संघ आहे, ज्यानं एकही सामना गमावलेला नाही.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles