Career

पदवीधर उमेदवारांना केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलात नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा | CISF Bharti 2024

मुंबई | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार CISF ने सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी पदाच्या 836 पदांसाठी रिक्त जागा (CISF Bharti 2024) जाहीर केल्या आहेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. विहित तारखेनंतर अर्ज प्रक्रिया बंद केली जाईल याची नोंद घ्यावी.

CISF Bharti 2024

एकूण रिक्त जागा : 836
यामध्ये अनारक्षित प्रवर्गासाठी एकूण ६४९ पदे आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण 125 पदे आणि अनुसूचित जमातीसाठी 62 पदे समाविष्ट आहेत.

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 01.08.2023 रोजी 35 वर्षे, म्हणजे, त्यांचा जन्म 02.08.1988 पूर्वी झालेला नसावा. अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंत शिथिलता. OBC उमेदवारांसाठी वयाची कोणतीही सूट लागू नाही.

निवड प्रक्रिया : वैद्यकीय तपासणी, लेखी परीक्षा, शारीरिक प्रतिनिधित्व आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे CISF मध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. या सर्व प्रक्रियेनंतर वैद्यकीय चाचणी होईल. या सर्व प्रक्रियेद्वारे तुमची सीआयएसएफच्या पदासाठी निवड केली जाईल.

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा. वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.

PDF जाहिरात – Central Industrial Security Force Jobs 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For CISF Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in


मुंबई | केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती (CISF Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 215 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

CISF Bharti 2023

वरील रिक्त पदांसाठी अर्ज 30 ऑक्टोबर  2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – खेळ, क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाचे श्रेय असलेल्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 12वी उत्तीर्ण.

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा. वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 30 ऑक्टोबर  2023 पासून अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – Central Industrial Security Force Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For CISF Driver Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in

Back to top button