वित्त मंत्रालयात मेगाभरती; पदवीधरांना थेट केंद्र सरकारी नोकरीची संधी | Finance Ministry Bharti 2024
मुंबई | वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Finance Ministry Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 19 जानेवारी 2024 पासून होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
न्यायिक सदस्य | 63 |
तांत्रिक सदस्य (केंद्र) | 32 |
तांत्रिक सदस्य (राज्य) | 01 |
Finance Ministry Bharti 2024
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज 19 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारल्यास कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Ministry of Finance Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Finance Ministry Application 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.dor.gov.in/