Bharat Pe कंपनीत पुणे येथे महिला उमेदवारांसाठी नोकरी; 50 रिक्त जागांसाठी भरती | Bharat Pe Job 2024

0
322

पुणे | भारत पे या देशातील नामांकित कंपनीसाठी (Bharat Pe Job 2024) पुणे येथे फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह/बिझनेस डेव्हलपमेंट या पदांसाठी 10वी पेक्षा कमी शिक्षण असलेल्या महिला उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यासाठी पात्र आणि इच्छूक महिला उमेदवारांनी हजर राहावे.

सदरचा भरती मेळावा भारती विद्यापिठ, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,धनकवडी, पुणे 41104 याठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 18 ते 45 वयोगटातील महिला यासाठी पात्र आहेत.

जाहिरात – Bharat PE Job 2024
नोंदणी – Bharat PE Job Registration 2024