Sunday, September 24, 2023
HomeCareerभारत डायनॅमिक्स येथे पदवीधरांना 1,40,000 पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | Bharat...

भारत डायनॅमिक्स येथे पदवीधरांना 1,40,000 पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | Bharat Dynamics Limited Bharti 2023

मुंबई | भारत डायनॅमिक्स लि.अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Bharat Dynamics Limited Bharti 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) येथे “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) च्या या भरती प्रक्रियेत अमरावती येथील युनिट ऑफिसेसाठी 45 ट्रेनी आणि ज्युनिअर ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
कल्याण अधिकारी – कला / विज्ञान / वाणिज्य किंवा सरकारने मान्यताप्राप्त कायदा विद्यापीठातील पदवी.
पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ज्यामध्ये केस कायदा, औद्योगिक संबंध, कार्मिक व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन आणि कामगार कल्याणाशी संबंधित इतर विषयांसह कामगार कायदे समाविष्ट आहेत.
कनिष्ठ व्यवस्थापक – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणी एमबीए / पदव्युत्तर पदविका / जनसंपर्क / संप्रेषण / जनसंवाद / पत्रकारिता 2 वर्षांची पदव्युत्तर पदवी

PDF जाहिरात –  BDL Recruitment 2023
ऑनलाईन (Apply Online) अर्ज – BDL Recruitment Application 2023
अधिकृत वेबसाईटbdl-india.in

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात. तसेच, अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular