शेवटची संधी: ITI, Diploma, Degree उमेदवारांना भारत डायनामिक्स मध्ये नोकरीची संधी; 361 जागांसाठी भरती | BDL Bharti 2024

0
1585

मुंबई | भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत तब्बल 361 रिक्त जागांसाठी भरती (BDL Bharti 2024) केली जाणार आहे. एकप्रकारे भारत डायनॅमिक्स लि. मध्ये केली जाणारी ही मेगाभरतीच आहे. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, प्रकल्प अभियंता/अधिकारी, प्रकल्प पदविका सहाय्यक/सहाय्यक, प्रकल्प व्यापार सहाय्यक/कार्यालय सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.

Bharat Dynamics Limited Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
प्रकल्प अभियंता/अधिकारी136 पदे
प्रकल्प पदविका सहाय्यक/सहाय्यक142 पदे
प्रकल्प व्यापार सहाय्यक/कार्यालय सहाय्यक83 पदे

BDL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता/अधिकारीBE/ B.Tech/ B.Sc इंजीनिअरिंग
प्रकल्प पदविका सहाय्यक/सहाय्यकराज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा संबंधित विषयातील समतुल्य अभ्यासक्रम (मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर्स/सिव्हिल/मेटलर्जी/केमिकल)
प्रकल्प व्यापार सहाय्यक/कार्यालय सहाय्यकसंबंधित विषयातील ITI (फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीशियन / मेकॅनिकल / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रो प्लेटिंग / संगणक / मिल राइट / डिझेल मेकॅनिक / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग / प्लंबर / रेडिओ मेकॅनिक) एनएसी किंवा राज्य / केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प अभियंता/अधिकारी30,000/- to 39,000/-
प्रकल्प पदविका सहाय्यक/सहाय्यक25,000/- to 29,500/-
प्रकल्प व्यापार सहाय्यक/कार्यालय सहाय्यक23,000/- to 27,500/-

PDF जाहिरातBDL Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For Bharat Dynamics Limited 2024
अधिकृत वेबसाईटhttps://bdl-india.in/