तुळस ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे. तुळसीचे महत्त्व प्रत्येकाला माहित असतेच. तुळस म्हणटले की आपल्याला आरोग्याशी सबंधित अनेक गोष्टी लक्षात येतात. परंतु आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे अनोखे आणि त्वचेसाठी असणारे फायदे (Basil Benefits for Skin) जे तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. तसं पाहिलं तर त्वचा उजळण्यासाठी तुळशीची मदत होते. यासारखे अनेक फायदे तुळशीमुळे त्वचेला होतात. चला तर मग पाहूया तुळशीचे त्वचेसाठी असणारे फायदे….
तुळशीचे त्वचेसाठी असणारे फायदे (Basil Benefits for Skin)
तुळशीच्या पानांची पेस्ट दुधात मिक्स करून लावल्यास त्वचा क्लीन होते आणि उठावदार दिसते.
तुळशीचा फेस पॅक बनवून तोही आपण चेहऱ्याला लावू शकता. त्यासाठी दुधासोबत समान मात्रेत तुळशीची काही पाने एकत्र वाटून घ्यावी. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावून वीस मिनिटांनी स्वच्छ धुवून टाकावी. (Basil Benefits for Skin) यामुळे त्वचेला टवटवी येते.
केसातील कोंड्यापासून सुटका मिळवायची असेल तर तुळशीच्या पानांचा हेअर मास्क तयार करु शकता. यासाठी चार – पाच तुळशीची पाने, अर्धा कप आवळा पावडर आणि थोडेसे पाणी घेऊन एकत्र करून ही पेस्ट काही वेळासाठी केसांना लावावी नंतर शॅंम्पू किंवा कंडीशनर लावून केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
मध आणि तुळशीच्या पानांची पेस्ट एकत्र चेहऱ्याला लावल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील डागांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करू शकता कारण तुळशीतील औषधी गुणधर्म इन्फेक्शन थांबण्यास मदत करतात. (Basil Benefits for Skin) यासाठी तुम्ही लिंबू आणि तुळशीच्या पानाचा रस एकत्र चेहऱ्याला लावून तो सुकल्यानंतर धुवून टाकू शकता.
केस चमकदार होण्यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट आणि अंड्याचा सफेद भाग एकत्र मिक्स करून तो केसांच्या मुळाशी आणि केसांना लावू शकता. यामुळे केसांच्या मुळाची त्वचा देखील चांगली राहते.
अशाप्रकारे तुळशीचे वेगवेगळे उपयोग आपल्याला त्वचेसाठी करता येतात. तुळस ही प्रत्येकाला सहज उपलब्ध होऊ शकते. तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घरासमोर तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. (Basil Benefits for Skin) तुळशीपासून अनेक सौंदर्यवर्धक तसेच आरोग्यवर्धक फायदे होतात. तसेच तुळशीच्या पानांचा चहा देखील पिला जातो.
(हे प्रयोग करत असताना आपल्या डॉकटर चा सल्ला नक्की घ्यावा.)