आरोग्य विभाग गट क व ड भरती रिस्पॉन्सशीट-उत्तरतालिका जाहीर; या लिंक वरून करा डाउनलोड | Arogya Vibhag Answer Key 2023

0
2009

मुंबई | आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती.

Arogya Vibhag Answer Key 2023

परिक्षा पार पडल्यानंतर मे. TCS- ION यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून  सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व अपेक्षित असलेली उत्तर तालिका (Answer Key) आज  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. खालील लिंक वरून उमेदवारांनी डाउनलोड करावी.

डाउनलोड करा

संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि. २०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकतीबाबत टि.सी.एस. चे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

Objection Fees For Arogya Vibhga Answer Key

टीसीएस कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करीता रु.१००/- प्रमाणे फी आकारण्यात येते. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केले जाणार नाही.