नाशिक महापालिकेत 587 पदांची नोकर भरती, तयारी अंतिम टप्प्यात | Nashik Mahanagarpalika Bharti 2023

Share Me

नाशिक | महापालिकेतील अग्निशमन तसेच आरोग्य-वैद्यकीय विभागांतील ५८७ पदांच्या नोकर भरतीची (Nashik Mahanagarpalika Bharti 2023) तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसमार्फत येत्या दोन-तीन दिवसांत प्रशासनाला सादर केला जाणार आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष नोकरभतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली आहे. (Nashik Municipal Recruitment)

नाशिक महापालिकेची आठ वर्षांपूर्वी ‘क’ संवर्गातून ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली असली, तरी महापालिकेचे मंजूर आस्थापना परिशिष्ट पूर्वीच्या ‘क’ संवर्गानुसार आहे. त्यानुसार महापालिकेत ७,०९२ पदे मंजूर असली तरी, सध्या यातील तीन हजार पदे ही सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या नवीन आकृतिबंधाची तयारी पालिकेकडून सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोना काळात राज्यशासनाने क संवर्गातील परिशिष्टानुसार, तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय विभागांच्या ७०६ पदांना भरतीसाठी अत्यावश्यक बाब म्हणून मंजुरी दिली होती.

शासन निर्देशांनुसार महापालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएसला काम देण्यात आले आहे. ब ते ड संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाऊ शकते. अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता, उर्वरित ६२४ पदांमधून अग्निशमन विभागातील ३७ ड्रायव्हरची पदे वगळली जाणार आहे. त्यामुळे एकूण ५८७ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी महापालिका आणि टीसीएसमध्ये कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

भरती केली जाणाऱ्या २६ संवर्गांतील ५८७ पदांकरिता आरक्षण निश्चितीही करण्यात आली आहे. यात जातिनिहाय आरक्षित पदे, पदवीधर, दिव्यांग, क्रीडा, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी राखीव पदांची निश्चिती करण्यात आली असून, त्यानुसार पदभरती केली जाणार आहे. (Nashik Municipal Recruitment)


नाशिक | नाशिक महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागसाठी विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी, एकूण 96 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहेत.

याठिकाणी जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, भूलतज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम या विविध पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सार्वजनिक वैद्यकिय विभाग, 3. रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात –  Nashik Mahanagarpalika Notification 2023
अधिकृत वेबसाईट – https://nmc.gov.in/


Share Me