Career

12 वी उत्तीर्णाना अमरावती महानगरपालिकेत नोकरीची संधी, 35 जागांसाठी भरती | Amravati Mahanagarpalika Bharti 2023

अमरावती | अमरावती महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू पदांच्या एकूण 35 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

Amravati Mahanagarpalika Bharti 2023

अर्ज सादर करण्याचे स्थळ – महानगरपालिका अमरावती, सावर्जनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती.

  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

शैक्षणिक पात्रता 
स्टाफ नर्स – वैध नोंदणीसह GNM/BSC नर्सिंग
एमपीडब्ल्यू – विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रातुन प्रसिध्द केले जाईल. तसेच अमरावतीचे वेबसाईट www.amravaticorporation.in वर जाहिरात उपलब्ध राहील. प्रत्यक्ष अर्जाची प्रत कार्यालयात आणुन दयावे. तसेच जिल्ह्याबाहेरील असलेले उमेदवारांनी अर्ज पोस्टब्दारे या कार्यालयात पाठवावे.

PDF जाहिरात Amravati Mahanagarpalika Jobs 2023
अधिकृत वेबसाईटwww.amtcorp.org

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग ( आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड 444601 येथे आणुन दयावा. अर्ज हे जाहीरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन 03/11/2023 ते 09/11 / 2023 कार्यालयीन वेळेत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आणुन दयावे.

अर्ज बंद पाकीट मध्ये असावेत, तसेच पाकीटवर “राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15 वा वित्त आयोगा अंतर्गत – या पदाकारीता अर्ज असे नमुद करावेत”. कुठल्या पदाकरीता तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची प्राप्त / अप्राप्त् यादी इत्यादी बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी अमरावती महानगरपालिका वेबसाईटवर www.amravaticorporation.in प्रसिध्द करणेत येईल. तसेच इतर कोणत्याही पध्दतीचा अवलंब करणेत येवू नये याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनश्च वर्तमानपत्रामध्ये जाहीरात दिली जाणार नाही.

उमेदवारांनी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी अमरावती महानगरपालिका वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येतील. आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित झाल्यावरच नियुक्ती आदेश देण्यात येतील..

Back to top button