भारतीय हवाई दल अंतर्गत 327 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | Air Force AFCAT Recruitment 2023

0
3520

मुंबई | भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (01/2024) करीता एकूण 316 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Air Force AFCAT Recruitment 2023)

Air Force AFCAT Recruitment 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज शुल्काविषयी : AFCAT एंट्री पोस्टसाठी शुल्क 250 रुपये आहे. तर, NCC स्पेशल आणि मेट्रोलॉजी पोस्टसाठी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशनकाळजीपूर्वक वाचावे. अर्ज 01 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदाचे नावपद संख्या 
फ्लाइंग शाखा38 पदे
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक)165 पदे
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)114 पदे

पगार – फ्लाइंग ऑफिसरचा महिन्याला 56 हजार 100 रुपये ते 1 लाख 77 हजार 500 रुपये प्रति महिना असेल.
इतरांच्या पगाराचा तपशील अधिसूचनेत उपलब्ध नसल्यामुळे, निवड प्रक्रियेदरम्यान याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

PDF जाहिरात Air Force AFCAT Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 01 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील)Apply For Air Force AFCAT Notification 2023
अधिकृत वेबसाईटhttps://afcat.cdac.in/