चंद्रपूर | जिल्हा परिषद चंद्रपूर आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी (ZP Chandrapur Bharti 2023) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 519 रिक्त पदे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत.
ZP Chandrapur Bharti 2023 – गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
या भरती अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) ही पदे भरण्यात येणार आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा.
उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे.
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000/- राखीव वर्ग – 900/-
- वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
PDF जाहिरात – ZP Chandrapur Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – https://ibpsonline.ibp
अधिकृत वेबसाईट – zpchandrapur.co.in