Tuesday, September 26, 2023
HomeCareerअहमदनगर जिल्हा परिषदेत 937 रिक्त जागांची भरती होणार | ZP Ahmednagar Bharti...

अहमदनगर जिल्हा परिषदेत 937 रिक्त जागांची भरती होणार | ZP Ahmednagar Bharti 2023

अहमदनगर | नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गातील 937 पदांची भरती (ZP Ahmednagar Bharti 2023) केली जाणार आहे. यापैकी सर्वाधिक 727 पदे आरोग्य विभागाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य सरकारला पाठवला आहे.

राज्य सरकारला पाठवलेल्या आराखड्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ संवर्गातील 927 जागा भरण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभाग पहिल्या टप्प्यात गट ‘क’मधील रिक्त पदांची भरती करणार आहे. त्यानंतर गट ‘ड’ मधील पदांचा विचार होऊ शकतो.

राज्यातील जिल्हा परिषदांमधील भरती आयबीपीएस मार्फत

जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया आयबीपीएस कंपनी राबवणार आहे. याबाबत प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात निघणार असून या कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. त्या दृष्टीने कंपनीने संकेतस्थळावर अर्ज भरण्याची तालीमही करून घेतली व येणाऱ्या अडचणी दूर केल्या आहेत.

जिल्हा परिषद सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच वर्तमानपत्रात देखील संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस एजन्सीमार्फत करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular