YCMOU अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची संधी | YCMOU Nashik Bharti 2024

Share Me

मुंबई | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 63 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर) पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – B. E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. or Integrated M.Tech. in relevant branch with first class or equivalent in any one of the degrees.

वेतनश्रेणी
शैक्षणिक समन्वयक (सहाय्यक प्राध्यापक स्तर) – Rs. 57,700/- per month (Consolidated)

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. शैक्षणिक अर्हता व  अधिक माहिती उमेदवारांनी ycmou.ac.in या संकेतस्थळावर पाहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात YCMOU Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराYCMOU Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ycmou.ac.in/


Share Me