WhatsApp PassKey फीचर झाले लाँच, तुमच्या अकाऊंटवर यामुळे काय फरक पडेल जाणून घ्या!
लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp चे गेले अनेक दिवस टेस्टिंगमध्ये असलेले PassKey फीचर अखेरीस लाँच झाले आहे. ह्या फीचरच्या मदतीने तुम्ही फिंगरप्रिंट, फेस आणि पिनच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप अकाऊंटमध्ये लॉग-इन करू शकता.
WhatsApp PassKey फिचरमुळे तुमचे अकाऊंट अधिक सुरक्षित राहील आणि युजर्स सहज अकाऊंटमध्ये लॉग-इन करू शकतील, असे कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे याआधी इंस्टंट मेसेजिंग अॅपने युजर्ससाठी Bottom Tab इंटरफेस रोलआउट केला होता. ह्या अपडेटनंतर तुम्हाला कम्यूनिटी, चॅट, अपडेट आणि कॉलची टॅब खालच्या बाजूला दिसते, जी आधी वरच्या बाजूला दिसत होती.
व्हॉट्सअॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करत सांगितले आहे की, Android युजर्स आता पासकी फीचरच्या माध्यमातून पिन, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉकच्या मदतीने अकाऊंट मध्ये लॉग-इन करू शकतील. तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचे अकाऊंट अधिक सुरक्षित होईल. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपच्या आधी Google आणि Apple ने पासकी फीचर रोलआउट केले होते.
iOS युजर्सना सध्यातरी PassKey साठी वाट पहावी लागणार
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने iOS युजर्ससाठी सध्या पासकी फीचर लाँच केलेले नाही. आशा आहे की येत्या काही दिवसांत ही सुविधा iPhone युजर्ससाठी उपलब्ध होईल.
Passkeys फिचर कसे वापरायचे?
एकदा का तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवर हे फिचर उपलब्ध झाले की तुमच्या सेटिंग्समध्ये Passkeyचा ऑप्शन दिसू लागेल. त्यानंतर तुम्हाला हे फिचर सेटअप करावे लागेल.
- व्हॉट्सअॅप अॅप डाऊनलोड करा आणि अपडेट करा.
- ह्या सेटअपसाठी तुम्हाला गुगल पासवर्ड मॅनेजर अॅप देखील आवश्यक असेल.
- आता व्हॉट्सअॅप ओपन करा आणि सेटिंगमध्ये जा.
- पासकी ऑप्शन शोधा आणि ओपन करा.
- त्यानंतर क्रिएट पासकी बटनवर क्लिक करा.
- एक पॉपअप विंडो ओपन होईल ज्यात पासकीची संपूर्ण माहिती असेल.
- माहिती वाचून तुम्ही कंटिन्यू टॅप करून पासकी तयार करू शकता.