Apple नेच कमी केली iPad ची किंमत; डिस्काउंट आणि कॅशबॅकसह जोरात विक्री सुरु | Apple has reduced the price of iPad

Share Me

अ‍ॅपलने आपल्या 10th जनरेशन आयपॅडच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने ह्या टॅबलेटची किंमत थेट 5000 रुपयांनी कमी केली आहे. हा आयपॅड गेल्यावर्षी 18 ऑक्टोबरला लाँच करण्यात आला होता. लाँचनंतर एक वर्षांनी अ‍ॅपलने पॅडच्या किंमतीत कपात (Apple has reduced the price of iPad) केली आहे.

Apple has reduced the price of iPad

नवीन आयपॅड वाय-फाय मॉडेल गेल्यावर्षी 44,900 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते, तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेल 59,900 रुपयांमध्ये सादर करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार ही कपात आयपॅडची नवीन जेनरेशन बाजारात येणार असल्याने करण्यात आली आहे.

आयपॅडची नवीन किंमत आणि ऑफर्स

10th जनरेशन आयपॅडची किंमत 39,900 रुपयांपासून सुरु होते. ज्याचा अर्थ असा की किंमत थेट 5000 रुपयांनी कमी झाली आहे. फेस्टिवल सीजनमध्ये 10th जनरेशन आयपॅडच्या नव्या किंमतीवर 4000 रुपयांचा कॅशबॅकही दिला जात आहे. त्यामुळे 10th जेनरेशन आयपॅड 35,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ही किंमत 9th जनरेशन आयपॅडच्या तुलनेत 3000 रुपये जास्त आहे.

विशेष म्हणजे अ‍ॅपलने आयपॅड प्रो, 9th आयपॅड एयर च्या किंमतीत कोणतीही कपात केली नाही. अ‍ॅपल पॅड अ‍ॅपल स्टोअर सोबतच अ‍ॅपल वेबसाइटवरून विकत घेता येईल. तसेच अ‍ॅपल पॅड अ‍ॅपलच्या पार्टनर स्टोरवरून देखील विकत घेता येईल.

Apple iPad 10th जरनेशनचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

10th जेनरेशनच्या आयपॅडमध्ये 10.9 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात ए14 बायोनिक चिपसेट देण्यात आली आहे. 10व्या जेनरेशनच्या आयपॅडमध्ये व्हिडीओ एडिटिंग, गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा अनुभव चांगला आहे. ह्यात 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जुन्या मॉडेलमध्ये 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. 10व्या जेनरेशनच्या आयपॅडमध्ये मोठ्या बॅटरी लाइफसह जास्त स्टोरेज ऑप्शन आणि यूएसबी-सी पोर्ट देण्यात आला आहे.


Share Me