तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट, तारखा जाहीर | Talathi Bharti Result 2024

0
221

मुंबई | तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट जाहीर झाली असून खालील लिंक वरून आपण बघू शकता. लवकरच सर्व जिल्ह्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच वेळापत्रक  तारखा जाहीर होतील.

तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल उमेदवारानासाठी महत्वाच्या  सूचना 

(1) संकेतस्थळावर आनलाईन पध्दतीने भरलेल्या मुळ अर्जाची प्रिंट आऊट (आवेदनपत्र) तसेच परिक्षा फीस जमा केल्याचा पुरावा.
(2) आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या उमदेवारांनी शासन निर्णय महसूल व वन विभाग
क्र.एससीवाय 12/05/प्र.क्र. 189/म-7 दि. 23/01/2006 अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुंटुंबास शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असल्यास त्या बाबतचे कागदपत्रे.
(3) उक्त सर्व कागदपत्रांची पुर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमूद सर्व निकषांची पुर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखुन ठेवले आहेत. (4) छायाचित्र ओळख पुरावा (ओळखपत्र / Photo Identity card) (आधारकार्ड/ वाहन परवाना/पॅनकार्ड/ राज्यनिवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र / राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक) नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज 02 फोटो..
(5) वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळविण्यात येते आहे की, सदर यादी या कार्यालयाचे जिल्हयाचे संकेतस्थळ www.hingoli.gov.in वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
(6) कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहील्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतर त्या निवड यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी दावा करता येणार नाही.
(7) शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांनी चारीत्रय व पुर्व चारीत्र पडताळणी करण्याबाबत सोबतच्या विहीत साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस भरुन सादर करावी.

  1. हिंगोली जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

तलाठी भरती जिल्हानिहाय निवड यादी जाहीर, जाणून घ्या तुमचा निकाल | Talathi Bharti Result 2024

मुंबई | वादग्रस्त ठरलेल्या बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. भूमि अभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. खालील लिंक वर यादी उमेदवारांना पाहता येईल.

तलाठी भरती जिल्हानिहाय लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

तलाठी भरती निकाल 2023 – निवड यादी व प्रतीक्षा यादी

ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे. पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे.

संबंधित यादी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. निवड प्रतीक्षा यादीनंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे यांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही नियुक्ती पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समिती मार्फत केली जाणार आहे.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यातमित्रांनो, तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर २३ जिल्ह्यांतील रिक्त पदांनुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची जिल्हानिहाय निवड याद्या आता जाहीर करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या PDF वर दिलेल्या आहेत.

महाभूमी वर प्रकाशित याद्यांची सरळ लिंक 

तलाठी सरळसेवा भरती – २०२३ जिल्हा निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी   


 अकोला कोल्हापूर नागपूर परभणी बुलडाणा भंडारा
 मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी लातूर वर्धा छत्रपती संभाजीनगर
 वाशिम सातारा सांगली सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली
 जालना बीड धाराशिव गोंदिया रायगड

तसेच, येत्या आठवडाभरापर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. 


मुंबई |  तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर २३ जिल्ह्यांतील रिक्त पदांनुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.

राज्यातून तलाठी परीक्षेसाठी सुमारे आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत. अर्जदारांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आल्या. दिवसातील तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर सहा जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

तलाठी परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात ही यादी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे – 
सरिता नरके, राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त

‘निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेण्यात येते. या याद्यांमध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार केला जाणार आहे. ही रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे. या याद्या २३ जिल्ह्यातील असून ते तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या आठवडाभरात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरावर जाहीर करण्यात येणार आहे,’ अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. दरम्यान, यशस्वी उमेदवारांना येत्या २६ जानेवारीला नियुक्ती पत्रे देण्याचे नियोजन सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


मुंबई | राज्यात राबवण्यात आलेल्या तलाठी भरती परिक्षेसंदर्भात गैरव्यवहार आणि अनियमितते बाबत प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु परिक्षा प्रक्रिया राबवणाऱ्या टीसीएस कंपनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून आता या आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता झाली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची सोमवार 8 जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. त्यावेळी वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या भरती प्रक्रियेदरम्यान एकूण 500 हरकती आलेल्या होत्या. त्यापैकी 24 हरकती स्विकारण्यात आल्या आहेत. शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर सर्वात जास्त हरकती आल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तलाठी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

200 पेक्षा जास्त गुण कसे मिळाले, कारण समजून घ्या?
सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑक्टगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण 149 प्रश्नांचे) केले. दिनांक 04/01/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


मुंबई | तलाठी भरती प्रक्रियेचा निकाल (Talathi Bharti Result 2024) जाहीर झाल्यानंतर दिनांक ०७/०१/२०२४ रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात.

तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

TCS तर्फे देण्यात आलेले स्पष्टीकरण (?Click करा)

सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची हि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे.