2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला, सर्व PDF येथे चेक करा | Talathi Bharti Result 2023

मुंबई | तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी ५ जानेवारी २०२४ रोजी रात्री १०.०० वाजता प्रकाशित झाली आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी (Talathi Bharti Result 2023) जाहीर केली आहे. खालील जिल्ह्यांच्या लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून युद्धपातळीवर पूर्ण केले असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक यांनी दिली.

दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. खालील लिंक वरून आपण आपला जिल्ह्याचा निकाल बघू शकता. 

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी  (Talathi Bharti Result 2023)


तलाठी भरती हरकती नुसार प्रशोत्तर सुधारणा अपडेट प्रकाशित!| Talathi Answer Key 2023 Download PDF

मुंबई | दि.२९/०९/२०२३ ते दि.८/१०/२०२३ या कालावधीत परीक्षार्थीनी परीक्षेच्या ५७ सत्रातील ५७०० प्रश्नापैकी २८३१ प्रश्नांबाबत १६२०५ शंका उपस्थित केल्या. सदर शंकानिरसन करण्यासाठी TCS कंपीनकडून विषय तज्ञ समितीने दि.६/१२/२०२३ रोजी प्रथमतः ९०७२ शंका मान्य करुन १४६ प्रश्नोत्तरे दुरुस्त केली. त्यानंतर दि. २२/१२/२०२३ रोजी पुन्हा ८५ शंका निरसन करत ही प्रश्नोत्तर संख्या १४८ झाली.

आता अंतिमतः आणखी १२ प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकुण पाच शंका मान्य करुन २ प्रश्नांना पुर्ण गुण व ३ प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करणेत आले आहेत. एकुण १४९ प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित गुण देणेत आले आहेत.


तलाठी भरती निकाल ‘या’वेळी जाहीर होणार? Talathi Bharti 2023

मुंबई | तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती, अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.

छाननी अंती ४४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुदत दिली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत.

दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, नरके म्हणाल्या.

परीक्षार्थी संख्या फार मोठी होती. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


तलाठी भरती संदर्भातील नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर | Talathi Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र.४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आली होती. सदर तलाठी पदभरती (Talathi Bharti 2023) करिता दिनांक १७/०८/२०२३ ते दि. १४/९/२०२३ या कालावधीत एकुण १९ दिवसामध्ये एकुण ५७ सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे.

Talathi Bharti 2023

दि.२८/०९/२०२३ रोजी पासून उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तरतालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत आली होती व त्याबाबत उमेदवारांना उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.२८/९/२०२३ ते दि.०८/१०/२०२३ रोजी पर्यंत TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात आली होती.

त्याबाबत TCS कंपनीकडून प्राप्त आक्षेप / हरकतीची आकडेवारी उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीचे समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडीवर माहिती उपलब्ध करुन देणेत येणार आहे.

ज्या सत्राच्या परिक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेस त्या सत्राची सुधारित (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तद्नंतर कोणतेही आक्षेप / हरकत विचारार्थ घेण्यात येणार नाहीत. 

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles