शेवटची संधी: पदवीधरांना सुप्रीम कोर्टात 80 हजार पगाराची नोकरी; ‘लिपक’ पदाच्या 90 रिक्त जागांसाठी भरती.. | Supreme Court Of India Bharti 2024

0
603

मुंबई | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Supreme Court Of India Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

  • अर्ज शुल्क – Rs.500/-
  • वयोमर्यादा – 20 वर्षे ते 32 वर्षे

Supreme Court Of India Bharti 2024

पात्रता – उमेदवार हा कायदा पदवीधर (कायदा लिपिक म्हणून नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी) कायद्याची पदवी (कायद्यातील एकात्मिक पदवी अभ्यासक्रमासह) कोणत्याही शाळा/कॉलेज/विद्यापीठ/संस्थेतून भारतातील कायद्याद्वारे स्थापित आणि बारद्वारे मान्यताप्राप्त संस्था असणे आवश्यक आहे. भारतीय परिषदेकडे वकील म्हणून नावनोंदणी.

निवड झालेल्या उमेदवारांना 80,000 दरमहा वेतनश्रेणी दिली जाईल. तरी सदर पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSupreme Court of India Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Supreme Court of India Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://main.sci.gov.in/