मुंबई | स्टाफ सिलेक्शन कमिशनने नुकतीच महाभरतीची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभाग/मंत्रालयांमध्ये कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ यासारख्या पदांवर ही भरती केली जाणार आहे.
या भरतीद्वारे तब्बल 3712 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 पर्यंत आहे. तर 10 आणि 11 मे रोजी अर्जातील दुरुस्ती करता येणार आहे.
पदाचे नाव
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 3712
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा
इतका पगार मिळेल :
1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – वेतन स्तर-2 (रु. 19,900-63,200).
2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) -पे लेव्हल-4 (रु. 25,500-81,100) स्तर-5 (रु. 29,200 – 92,300/-)
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’वेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100)
वयोमर्यादा
वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. SC/ST ला 5 वर्षांपर्यंत, OBC 3 वर्षांनी, PwBD (अनारक्षित) 10 वर्षांनी, PwBD (OBC) 13 वर्षांनी आणि PwBD (SC/ST) यांना 15 वर्षांनी कमाल वय सूट दिली जाईल. (अधिक माहितीसाठी सूचना पहा.)
अर्ज फी : अर्जाची फी रु 100 आहे. महिला उमेदवार, SC/ST, अपंग, माजी सैनिकांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
निवड प्रक्रिया :
1. एसएससी सीएचएसएलमध्ये दोन टप्प्यातील लेखी परीक्षा असेल – टियर-1 आणि टियर-2. दोन्ही परीक्षा संगणकावर आधारित असतील.
2. टियर-1 पेपरचे चार भाग असतील. प्रत्येकी 25 प्रश्न असतील. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
3. परीक्षेत ०.५० गुणांचे निगेटिव्ह मार्किंगही असेल. तर टियर-2 परीक्षेत दोन सत्रे असतील.
4. पहिले सत्र लेखी परीक्षेचे असेल आणि दुसरे सत्र कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणीचे असेल.
PDF जाहिरात : SSC CHSL Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा : Apply Online
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in