रत्नागिरी | राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 73 जागा भरण्यात (Ratnagiri Government Jobs) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
Ratnagiri Government Jobs
या भरती अंतर्गत विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला), रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक-आरएनटीसीपी,जिल्हा सल्लागार- NTCP, सीपीएचसी सल्लागार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक-आयुष, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, सुविधा व्यवस्थापक, पोषणतज्ञ/आहार प्रात्यक्षिक, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर- आयुष, केस रजिस्ट्री सहाय्यक, लेखापाल सह DEO/प्रोग्राम असिस्टंट – IDW, डेटा एंट्री ऑपरेटर, रक्तपेढी तंत्रज्ञ ही पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा –
- एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ – 70 वर्षे
- वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता – 65 वर्षे
- इतर पदे खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी – रु. 150/-
- राखीव प्रर्वगातील उमेदवारांनी – रु.100/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती http://ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. वरील दिनांकानंतर आलेला अर्जचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – NHM Ratnagiri Bharti 2023
शुध्दीपत्रक – NHM Ratnagiri Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/