पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Pune University Bharti 2024) येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदरच्या प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी त्यात काही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपली होती. आता मुदतवाढ मिळाल्याने उमेदवारांना येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 16 फेब्रुवारी 2024 आहे.
Pune University Bharti 2024
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याचा पत्ता – सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007
शैक्षणिक पात्रता – पीएच.डी.
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 32 पदे |
सहयोगी प्राध्यापक | 32 पदे |
सहायक प्राध्यापक | 47 पदे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | Rs. 1,44,200/- |
सहयोगी प्राध्यापक | Rs. 1,31,400/- |
सहायक प्राध्यापक | Rs. 57,700/- |
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Pune University Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Pune University Recruitment Application 2024
अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/