Career

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | NUHM Vasai Virar Bharti 2024

मुंबई | वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ( NUHM Vasai Virar Bharti 2024) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत रिक्त जागांसाठी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. तर काही पदांसाठी गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार आहे. एकूण 26 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी- बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, M.B.B.S. या संवर्गातील पदांसाठी 20 डिसेंबर 2023 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया थेट मुलाखतीशिवाय गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या पदांकरिता उमेदवारांनी अर्ज 20 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 या तारखेला करावे.

NUHM Vasai Virar Bharti 2024

वयोमर्यादा –

  • बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 65 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू)
निवड प्रक्रिया – मुलाखती (बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी)
मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.)

फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNUHM Vasai Virar Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttps://vvcmc.in/

Back to top button