HomeCareerनोकरी संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध: 12वी ते पदवीधरांसाठी मुथूट मायक्रोफिन लि. मध्ये 470...

नोकरी संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध: 12वी ते पदवीधरांसाठी मुथूट मायक्रोफिन लि. मध्ये 470 रिक्त जागांसाठी भरती, 35 हजार पगार | Muthoot Finance Bharti 2024

मुंबई | मुथूट मायक्रोफिन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Muthoot Finance Bharti 2024) केली जात आहे. या भरती अंतर्गत तब्बल 470 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये रिलेश्नशिप अधिकारी (RO), शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, एरिया क्रेडिट व्यवस्थापक, एरिया अधिकारी पदांचा समावेश आहे.

वरील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 आणि 24 फेब्रुवारी 2024 आहे.

Muthoot Finance Bharti 2024

वरील रिक्त पदे मुथूट मायक्रोफिनच्या महाराष्ट्रातील सर्व शाखांसाठी भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 12वी किंवा पदवीधर असावी. इच्छूक उमेदवारांनी आपल्या नजीकच्या मुथूट मायक्रोफिन कार्यालयात मुलाखतीसाठी हजर राहावे.

पदाचे नावपद संख्या 
संबंध अधिकारी (RO)150+
शाखा व्यवस्थापक50
शाखा क्रेडिट व्यवस्थापक50
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक20
 क्षेत्र अधिकारी200
पदाचे नाववेतनश्रेणी
संबंध अधिकारी (RO)23,600/- Per Month
शाखा व्यवस्थापक, शाखा क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी35,000/-

Muthoot Microfin Limited Bharti 2024

केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. सदर पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर पदांकरिता मुलाखती 23 आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMuthoot Microfin Limited Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराMuthoot Microfin Limited Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.muthootfinance.com/

हेही वाचा – ?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular